आष्टा / वार्ताहर
आष्टा येथील बाप लेकास मोबाईलच्या तसेच जागेच्या कारणावरून लोखंडी गज तसेच काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. अजित विजय जाधव व विजय पांडुरंग जाधव राहणार आष्टा असे या घटनेत जखमी झालेल्या बाप-लेकांची नावे असून पोलिसांनी संशयित आरोपी वसंत संपत औताडे, विक्रम प्रदीप घाडगे, नरेश घाडगे यांचेसह अन्य एका अनोळखीवर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात विजय पांडुरंग जाधव यांनी फिर्याद दिली आहे. विजय जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १६ रोजी सहाच्या सुमारास मला व माझा मुलगा अजित यास वसंत संपत औताडे यांच्या सांगण्यावरून विक्रम घाडगे, नरेश घाडगे व अन्य एका अनोळखीने आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पारेने तसेच काठीने मारहाण करून अजित औताडे यास गंभीर जखमी केले. तसेच मलाही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संशयित आरोपींनी पाच हजार रुपयांची खंडणीही मागितली. याबाबत आष्टा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








