वार्ताहर / बागणी
जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र बागणी यांच्या सहकार्यातून येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे ३० बेडचे कोविड १९ सेंटर याचे उद्घाटन सकाळी ९ वा. पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या बाबतची अधिक माहिती कारखाना संचालक लक्ष्मणराव माळी व शिगाव चे माजी सरपंच उदयसिंह पाटील यांनी सांगितले. बागणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बागणी, शिगाव, काकाचीवाडी, रोझावाडी, फाळकेवाडी, नागाव, ढवळी, फारणेवाडी, कोरेगाव आदी ९ गावे येत असून या गावात कोविड १९ चे रुग्ण संख्या देखील लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे आम्ही मंत्री जयंतराव पाटील यांना या गावातील रुग्णांसाठी जवळपास सोया व्हावी आणि लोकांचे देखील हाल होऊ नये जीव वाचावा या साठी आम्ही विनंती केली होती की या ठिकाणी कोविड सेंटर उभे राहिले जावे म्हणून. या विनंतीस मंत्री पाटील यांनी लगेच होकार देत या ठिकाणी ३० बेडचे कोविड १९ सेंटर उभे करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये १० बेड हे ऑक्सिजन युक्त असणार आहेत. ह्या कोविड सेंटरमुळे भागातील सर्व रुग्णांना तात्काळ उपचार मिळणार आहेत. व लोकांची खाजगी रुग्णालयातील लूट थांबली जाणार आहे. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. या कोविड १९ सेंटर साठी शिगावचे माजी सरपंच उदयसिंह पाटील व कारखाना संचालक लक्ष्मणराव माळी, जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, आरोग्य अधिकारी, व भागातील नेते उपस्थित राहणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








