आज 101 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 28, 803 वर
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज शनिवारी 101 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 66 पुरुष, 35 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 813 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 28 हजार 803 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 821 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1287 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1186 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 101 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 813 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 24 हजार 169 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट – 1057
मंगळवेढा- 1332
बार्शी – 5192
माढा- 2930
माळशिरस – 4924
मोहोळ- 1293
उत्तर सोलापूर – 710
करमाळा- 1994
सांगोला – 2289
पंढरपूर 5698
दक्षिण सोलापूर – 1384
एकूण – 28, 803
होम क्वांरटाईन – 4883
एकूण तपासणी व्यक्ती- 219842
प्राप्त अहवाल- 219795
प्रलंबित अहवाल- 47
एकूण निगेटिव्ह – 190993
कोरोनाबाधितांची संख्या- 28,803
रुग्णालयात दाखल – 3821
आतापर्यंत बरे – 24,169
मृत – 813









