- पाईपलाईन फुटल्याने 40 घरांमध्ये पाणी शिरले
ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात पार्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईप लाईन फुटल्याने जवळपास 40 पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेकांच्या घरातील रहिवासी, सामान, वस्तू या अक्षरशः वाहत खाली आल्या. यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 11.30 च्या आसपास ही घटना घडली. जनता वसाहतीतील विठ्ठल मंदिराजवळ असलेली पाईप लाईन अचानक फुटली आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये वेगाने पाणी शिरले की घरातील अनेक जण पाण्याबरोबर वाहत गेले. आदळेेेेे गेल्याने त्यांना जखमा देखील झाल्या.
यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिक चिडले आहेत. तसेच लवकरात लवकर ही पाईप लाईन बदलण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.