प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर पोलिसांनी तालुक्यातील फोफावलेल्या अवैध गावठी दारू अड्डय़ांवर धाडसत्र सुरू केले आहे. 13 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या या कारवाईत आतापर्यंत सहा गावठी व विदेशी दारू अड्डय़ांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 16,595 रूपये किंमतीची गावठी व विदेशी दारू जप्त केली आहे.
या कारवाईत आबलोली येथे भरबाजारपेठेतून दिनेश तानू निवाते (32) यास दारू विकताना रंगेहात पकडून त्याच्याकडून 1530 रूपयाची दारू, याच बाजारपेठेत महेश दत्ताराम खैर (40) यालाही दारूधंदा करताना पकडून त्याच्याकडून 1530 रूपयाची दारू, जामसुत येथील सचिन सुधाकर झोंबडकर (33) याच्याकडून 1600 रूपयाची गावठी दारू, वेलदूर येथील राजू किसन खातू (49) याच्याकडून विदेशी 8385 रूपयाची दारू, नरवण येथील राजेंद्र विनायक कोळवणकर (48) याच्याकडून देशी 1980 रूपयाची दारू, त्याचबरोबर नरवण येथीलच प्रविण पांडुरंग जाधव (45) याच्याकडून 1570 रूपयाची गावठी दारू जप्त केली आहे.
ही कारवाई पोलस उपनिरीक्षक किरणकुमार कदम, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहळ, दीपक साळवी, राजू कांबळे, संतोष माने, आदिनाथ आदवडे, सचिन चव्हाण, सचिन पाटील, सुषमा वरेकर यांच्या पथकाने केली.









