वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकांकडून देण्यात येणाऱया उधारीत(क्रेडिट ग्रोथ)होत असणारी वाढ ही सलग सहाव्या तिमाहीत घसरली आहे. जून तिमाहीत हा आकडा 5.7 टक्क्यांवर राहिला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) यांनी सादर केलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे. बँकांजवळ सध्या एकूण 141 लाख कोटी रुपयांची डिपॉझिटस् असून उधारी 100 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.
औद्योगिक क्षेत्रातील उधारी ही जून तिमाहीत वर्षाच्या आधारे 0.6 टक्क्यांनी घसरली असून याच उधारीतील हिस्सा हा 30.08 टक्क्यांवर राहिलेला आहे. दुसरीकडे घरगुती क्षेत्रातील उधारी वर्षाच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वधारली आहे.
सरकारी बँकांकडून 60 लाख कोटींचे कर्ज वितरण
सरकारी बँकांची कर्ज वितरणातील हिस्सेदारी ही 60 लाख कोटी रुपयांची आहे. खासगी बँकांची हिस्सेदारी 35.5 लाख कोटींवर तर विदेशी बँकांची हिस्सेदारी 4.1 लाख कोटींवर राहिली आहे.
उधारीमधील कर्जाची पुर्नरचना?
रेटिंग एजन्सी केआरच्या माहितीनुसार भारतीय बँकांची एकूण उधारीमध्ये 4 ते 5 टक्क्यांनी उधारी रिस्ट्रक्चर(पुर्नरचना) होण्याची माहिती आहे. कोरोना संकटामु ळे कर्जातील पुर्नरचनेसाठी योजनाही सादर केली आहे. याचाही काही प्रमाणात लाभ होण्याची माहिती आहे.









