प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पंचायतमधील स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. दोन स्थायी समित्यांवर भाजप तर तीन स्थायी समित्यांवर काँग्रेसच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली. यावेळी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, विधानपरिषद सदस्य साबण्णा तळवार हे उपस्थित होते.
जिल्हा पंचायतीचे उपसचिव एस. बी. मुन्नोळी यांनी नूतन सदस्यांची नावे जाहीर केली. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सिद्धाप्पा अप्पाण्णा मुदकण्णावर (कोकटनूर) यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी सुरेखा अमोल नाईक (दरुर), लक्ष्मी निंगाप्पा कुरबर (करोशी), बसवराज देमाप्पा बंडीवड्डर (मुरगोड), मल्लाप्पा सिद्धाप्पा हिरेकुडी (हुली), राजेंद्र रामाप्पा पवार (भोज), शशिकला राजेंद्र सन्नकी (मेळवंकी) यांची निवड करण्यात आली.
कृषी आणि उद्योग स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निंगाप्पा रामाप्पा पकांडी (देमापूर) तर सदस्यपदी माधुरी बाबासाहेब शिंदे (अनंतपूर), अजित कृष्णराव देसाई (यरगट्टी), सुमन मडिवाळाप्पा पाटील (हलगा), लावण्या शामसुंदर शिलेदार (नागनूर), मिनाक्षी सुधीर जोडट्टी (सिंदीकुरबेट), निंगाप्पा आर. अरकेरी (नेसरगी) यांची निवड झाली.
सामान्य स्थायी समिती अध्यक्षपदी अरुण अण्णू कटांबले (कडोली) तर सदस्य म्हणून महांतेश मल्लाप्पा मगदूम (हेब्बाळ), सरस्वती रामचंद्र पाटील (उचगाव), सिद्धू नागाप्पा नराटे (अक्कोळ), सुदर्शन अण्णासाहेब खोत (नेज), सुजाता सूर्यकांत चौगुले (हिरेकुडी), कस्तुरी बसवंत कमती (तुक्मयानट्टी) यांची निवड करण्यात आली.
सामाजिक न्याय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी फकिराप्पा डी. हादण्णावर (मबनूर), सिद्धगौडा बाबुराव सुनगार (काकती), शिवाक्का देवाप्पा बेळवडी (सुरेबान), सुरेश फकिराप्पा मॅगेरी (कक्केरी), भारती बी. बुटाळे (ऐगळी), शंकर बी. माडलगी (बुडरकट्टी), गोविंद बी. कोप्पद (यादवाड) अशी निवड झालेल्या सदस्यांची नावे आहेत.
याचबरोबर अध्यक्षा आशा ऐहोळे यांची नियोजन (प्लॅनिंग) कमिटीच्या अध्यक्षपदी जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून जितेंद्र टोप्पाण्णा मादार (खानापूर), गुराप्पा शिवसिंग दाशाळ (अथणी), कृष्णाप्पा बाळाप्पा लमाणी (रामदुर्ग), रमेश भीमाजी देशपांडे (रामदुर्ग), अनिल मेकलमर्डी (सौंदत्ती), शिवगंगा गोरवनगोळ (सौंदत्ती) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा पंचायतच्या सभागृहामध्ये सकाळी 10.30 पासूनच या निवडणुकीसाठी हालचाली सुरू होत्या. पालकमंत्री रमेश जारकीहोळी आल्यानंतर या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.









