ऑनलाईन टीम / पीलीभीत :
उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात शनिवारी एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 32 लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पीलीभीत मधील पुरानापूर जिल्ह्यात झाली. एक बस यात्रेकरूंना घेऊन जात होते. या बसला भीषण अपघात झाला. बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत. तर 32 हून अधिक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 730 वर हा अपघात झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खेद व्यक्त केला असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनस्थळी पोहचून मदत करण्याचे आदेश केले आहेत.









