महिलेसह दोघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. शुक्रवारी दिवसभरात 94 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महिलेसह दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्याअधिक आहे. त्यामुळे साहजिकच सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.
शुक्रवारी बेळगाव येथील एक महिला व गोकाक येथील एका रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहर व उपनगरांतील 31 व ग्रामीण भागातील 3 असे तालुक्यातील 34 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
बरे होणाऱयांची संख्या वाढती आहे. कोरोनामुक्त झालेल्या 401 जणांना शुक्रवारी घरी पाठविण्यात आले आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 23 हजार 566 वर पोहोचली असून मृतांचा सरकारी आकडा 324 इतका आहे. तर आतापर्यंत 21 हजार 328 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 914 सक्रिय रुग्ण आहेत.
आणखी 3 हजार 190 जणांचे अहवाल यायचे आहेत. तर 34 हजार 204 हून अधिक जण अद्याप 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत जिह्यातील 1 लाख 93 हजार 187 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 211 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सुळेभांवी, बेनकनहळ्ळी, न्युगुडस्शेड रोड, बॉक्साईट रोड, चिदंबरनगर, हनुमाननगर, राणी चन्नम्मानगर, जेएनएमसी कॅम्पस, कुमारस्वामी लेआऊट, लक्ष्मीनगर-वडगाव, लक्ष्मीटेकडी, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, साईनगर-वडगाव, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, सोमनाथनगर, टिळकवाडी, वैभवनगर, विजयनगर, न्युवैभवनगर, अनगोळ परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.