प्रतिनिधी / विटा
गेल्या काही दिवसात खानापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास पंधरा रस्ते पाण्याखाली गेले होते. साळशिंगे येथील विटा कलेढोण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानंतर त्याची दुरवस्था झाली आहे. मोठे खड्डे आणि पाण्याच्या दाबाने एका बाजूला खचल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
खानापूर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील जवळपास पंधरा रस्ते पाण्याखाली गेले होते. चार दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील विटा ते सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कलेढोण रस्त्यावरील साळशिंगे येथील पुलावर चार दिवस पाणी होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आता पाणी ओसरल्यावर पुलाची दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. हा पूल भाग्यनगर तलावा जवळ आहे. भाग्यनगर तलावाचे फुगवट्याचे पाणी या पुलाला टेकते. तशातच गेले दोन दिवस पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने पुलाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरंक्षक दगड वाहून गेले आहेत. पुलावर दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ता वाहून गेला आहे.
या मार्गावरून विटा – कलेढोण प्रवास करणारे अनेक लोक मधल्या मार्गे कमी अंतरामुळे प्रवास करतात. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होते. खड्डे पडल्यामुळे आणि बाजूचे बांधकाम खचल्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सदर पूल दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. सदर पुलावरून दरवर्षी पाणी जात असल्याने त्याची उंची वाढवण्याची गरज आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








