प्रतिनिधी / सांगरूळ
सभासद व संस्था हिताला प्राधान्य देत सांगरुळ च्या दत्त दूध संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे . .सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था सातत्याने समाजहिताचे विविध उपक्रम राबवून चांगल्या कार्याला नेहमीच पाठबळ देत आहे .संस्थेचे हे कार्य आदर्शवत आहे .असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा संस्थाचालक संघाचे सचिव व शिक्षक नेते प्रा .जयंत आसगावकर यांनी केले .सांगरूळ तालुका करवीर येथील श्री दत्त दूध संस्थेच्या वतीने आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते .
यावेळी बोलताना प्रा .जयंत आसगावकर
यांनी दत्त दूध संस्थेने दूध उत्पादकांना विविध प्रकारची प्रोत्साहनपर बक्षिसे ,डिव्हीडंट, दूध रिबेट,दूध फरक या माध्यमातून आर्थिक लाभ देताना दूध उत्पादक व दूध संस्थेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विविध उपक्रम चांगल्या प्रकारे राबविले आहेत . याच्याही बाहेर जाऊन सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाच्या विविध उपक्रमांना पाठबळ दिले आहे .हे प्रेरणादायी आहे असे सांगितले . स्वागत प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन नानासो कासोटे यांनी केले . सूत्रसंचालन संचालक विलास नाळे यांनी तर आभार संस्थेचे संचालक सर्जेराव नाळे यांनी मानले.
यावेळी माजी जि.प. सदस्य बाजीनाथ खाडे ,कृष्णात खाडे, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे ,ज्ञानदेव खाडे, शिवाजी भाट यांचेसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ संस्थेचे संचालक आणि कर्मचारी सभासद उपस्थित होते.