शाहुवाडी /प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम खूप मोलाचे आणि महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन शाहूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी शाहूवाडी येथे केले. ते शाहूवाडी पंचायत समिती येथे दहावी भूगोल पाठ्यपुस्तक डिव्हिडी सादरीकरण सोहळा प्रसंगी बोलत होते . पुढे बोलताना नाईक म्हणाले की विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढावी त्यांच्या बौद्धिक क्षेत्रात अधिकाधिक भर पडावी , जिज्ञासू वृत्ती न नवं काहीतरी शिकण्याची आस निर्माण व्हावी यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
दरम्यान प्रारंभी तानाजी पाटील पिशवीकर माध्यमिक विद्यालय शित्तुर तर्फ मलकापूर यांनी भूगोल पाठ्यपुस्तकाच्या तयार केलेल्या डिव्हिडींचे सादरीकरण गटशिक्षणाधिकारी मा. उदय सरनाईक , विस्ताराधिकारी मा नंदकुमार शेळके व प्रभारी विस्तार अधिकारी मा. सदाशिव थोरात यांच्या हस्ते पंचायत समिती शाहूवाडी येथे संपन्न झाले. याप्रसंगी श्री तानाजी पाटील सर ,के.आर.रोडे सर ,बी.टी.पाटील सर, बी.बी .कांबळे सर ,टी.डी.पाटीलसर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत रोडे सर यांनी तर आभार बी.टी. पाटील सर यांनी केले.