आळसंद /वार्ताहर
येरळा नदी काठावर व कडेगाव, खानापूर तालुक्यात बुधवारी सकाळ पासून गुरुवार सकाळ पर्यन्त पावसाच्या कहराने येरळा नदीला प्रचंड मोठा पूर आला असून शेतीचे भयानक नुकसान झाले असून वाझर बंधाऱ्यांची दारी वेळेत काढली नसल्याने पाणी गावात शिरले असून गावचा संपर्क तुटला आहे काही लोकांच्या घरात पाणी शिरले असून
गाव अलर्ट करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असून सुद्धा व शासनाने अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देऊन सुद्धा पाठबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी दारी काढण्याची तसदी घेतली नसल्यामुळे गावात पाणी शिरले आहे
येरळा नदी दुथडी वाहत असून नदी काठच्या पिकांचे पण नुकसान झाले विटा वाझर रस्ता पूर्णपणे बंद झाला असून रस्त्यांवर तीन फूट पाणी आहे पवार वस्तीवर सुरेश पवार विमल पवार शिवाजी पवार, रमेश पवार, दुर्योधन पवार यांच्या घरात पाणी शिरले आहे या पाच कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पाठबंधारेचा अधिकारी इकडे फिरकले सुद्धा नसून या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पूर परिस्थितीची पाहणी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केली आहे. दमदार पावसामुळे येरळा नदीला पूर आला असून या नदीवर असणारे भाळवणी कमळावर बलवडी भा वाझर आंधळी पूल पाण्याखाली गेले आहेत
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








