सोलापूर / प्रतिनिधी
नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य तुळजापूरला कामानिमित्त गेले असताना त्यांना सोलापूर येथील राहुल परकीपंडला यांच्याकडून ता. उमरगा येथील येनेगूर गावात एक मोठा घुबड जखमी असल्याची भ्रमणध्वनी वरून माहिती मिळाली. त्यांनी लगेच ज्या ठिकाणी घुबड जखमी घुबड पडले होते त्या शेतकऱ्याचा नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवून त्या जखमी घुबड पक्ष्याला नेमके काय झाले व लवकरात लवकर त्यावर उपचार व्हावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.माहिती मिळताच नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे दोन सदस्य तुळजापूर कडून थेट येनेगूर गावाच्या दिशेने निघाले अवघ्या ३० मिनिटांत दोघेजण घटनास्थळी पोहोचून पाहणी केले असता ते शृंगी घुबड असल्याची खात्री झाली. उमरगा ता. येनेगूर गाव येथील शेतकरी विश्वराज बिराजदार यांच्या शेतात सकाळ पासून एकाच ठिकाणी ते घुबड बसून आहे अशी त्यांनी यावेळी माहिती दिली.
शृंगी घुबड हे वन विभागाच्या वन्यजीव सुची १ मधला पक्षी असल्यामुळे वन विभागाला कळवणे अत्यंत गरजेचे होते परंतु उमरगा तालुक्यातील घटना होती त्यामुळे तेथील वन विभागाचा कुणाचाही परिचय किंवा मोबाईल नंबर नव्हता त्यामुळे लगेच नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत छेडा यांना सत्य परिस्थिती सांगितले असता त्यांनी लगेच वन परिक्षेत्र अधिकारी सोलापूर इरशाद शेख यांच्या मदतीने उमरगा येथील वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शिपे साहेब यांचा मोबाईल नंबर मिळवून तात्काळ त्या जखमी घुबडाची माहिती कळविली असता त्यांनी लगेचच अवघ्या १५ ते २० मिनिटांत त्यांचे वनरक्षक टी.ए. डिगोळे यांना घटनास्थळी पाठवून जखमी घुबड पक्ष्याची पाहणी करून पंचनामा केला.
तसेच त्या जखमी शृंगी घुबड पक्ष्यावर उपचार करण्यासाठी सोलापूरला घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडून पत्रव्यवहार करून ते घुबड नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य एका कार्टून बॉक्स मध्ये ठेवून अवघ्या एक ते दीड तासात ते घुबड घेऊन सोलापूरात दाखल झाले. सोलापूरात पोचल्यानंतर भरत छेडा यांनी लगेच ॲनिमल राहत संस्थेचे डॉक्टरांना संपर्क साधला परंतु कुणीच उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांनी स्वतः त्याच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी बॉक्स मधून बाहेर काढले असता घुबड पक्ष्याचे डाव्या बाजूचे एक पंख आणि पाय हे गंभीर जखमी असल्याचे लक्षात आले.
त्यांनी पून्हा वन परिक्षेत्र अधिकारी उमरगा श्री. शिपे साहेब यांना संपर्क साधून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू चॕरीटेबल ट्रस्ट संस्थेकडे पाठवावे लागेल असे सुचविले असता त्यांनी लगेच होकार दिला व त्यांच्याकडून तसे पत्रव्यवहार करून जखमी शृंगी घुबड सोलापूर वरून पुण्याला रेस्क्यू चॕरीटेबल ट्रस्ट यांच्याकडे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले…









