अग्रणी नदीवरील ७ पूल पाण्याखाली, मुसळधार पावसाने खरीपाचे नुकसान
वार्ताहर / सावळज
असुन अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच परीसरातील अग्रणी नदीवरील ७ पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक काही काळ बंद करण्यात आली होती. मात्र या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तासगांव तालुक्याच्या पूर्व भागातील वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, सिध्देवाडी, दहिवडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी दिवसभर झालेल्या दमदार पावसाने कहर केला. पहाटेपासुन तुफानी पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे अग्रणी नदीला पूर येवुन पावसामुळे ओढे – नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत.
चार दिवसात अग्रणी नदीला दोनदा पुर आला असुन बुधवारी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर जावुन पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी ही परीसरात झालेल्या मुसळधार पाऊसाने परिसरातील ओढे नाले, बंधारे तुडुंब भरून वाहु लागले होते. सिध्देवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तलावाच्या सांडव्यावरून जोरदार प्रवाहाने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे तलाव परिसरातील धबधब्याने व अग्रणी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. मात्र या पावसामुळे पावसाचा खरीप पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
अग्रणी पात्रातील ७ पूल पाण्याखाली
तासगांव पुर्व भागात झालेल्या तुफानी पावसामुळे अग्रणी नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. जोरदार पावसामुळे अग्रणी नदीवरील सावळज येथील यल्लमा मंदीर परिसरातील बिरणवाडी रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत आहे. या अगोदरच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलांचा कठडा व सुरक्षा रक्षक ग्रील तुटुन पडुन पुल धोकादायक बनल्याने पुलावरून पाणी वाहत असताना प्रशासन खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतुक बंद केली आहे. तसेच येथील सावळज – श्री जोतीबा रोड जुना तासगाव रस्ता वरील पुल, सिध्देवाडी ते चव्हाणवस्ती, वायफळे – यमगरवाडी, वायफळे-सैनिकमळा पुल, गव्हाण-वज्रचौंडे पुल, गव्हाण – मणेराजुरी अग्रणी पात्रातील पूल पाण्याखाली गेले. यासह परिसरातील ओढे-नाले वरील अनेक पुलावर पाणी आले असुन अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे.
Previous Articleशेततळ्यातील पाणी तात्काळ कमी करा : रवींद्र माने
Next Article कोते सरपंचावरअविश्वास ठराव मंजूर








