अरुण लाड यांनी घेतली शरद पवार यांची मुंबईत भेट
वसगडे / वार्ताहर
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. त्यांच धर्तिवर गेल्या निवडणुकीत बंडखोरी करुन भरघोस मते मिळवुन सुध्दा पराभव पत्करावा लागलेले सांगली जिल्ह्यातील क्रांती समुहाचे अरुण लाड यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कुलपती शरद पवार यांची मुबंई येथे जाऊन मंगळवारी भेट घेतल्याने आण्णाच्या ‘एटीकेटी’ ला बारामतीच्या राजकिय युनिव्हरसिटीच रिसिट मिळणार का ? याची जोरदार चर्चा मतदारसंघांत सुरु झाली आहे. गतवेळचे पक्षाचे अधिकृत उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने लाड यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे पदवीधर मधुन राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी क्रांती उद्योग समुहाचे अरुण अण्णा लाड यांना देण्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी पलूस येथील क्रार्यक्रमात तीन वर्षा पुर्वी दिले होते. गेल्यावेळी झालेली चूक यावेळी दुरुस्त करु असंही पवार म्हणाले हाते. त्यामुळे लाड यांची उमेदवारी गेल्या दोनव र्षापासुन निश्चित मानली जाते.
मात्र पक्षाचे कुलगुरु जयंत पाटील यांच्या भूमिकेवरच त्यांची उमेदवारी अवलंबून असणार आहे. युती सतेत असताना शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातुन काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तिन वेळा पवार कुटुंबीयांना पलूस ला आणुन जिल्ह्यात राष्ट्रवादी रिचार्ज करण्यात लाड कुटुंबीय यशस्वी झाले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांची दारे सताड उघडी आहेत ही त्यांची जमेची बाजु आहे. तरीही त्यांना उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
अलिकडेच राष्ट्रवादी ने वकृत्वावर प्रभुत्व असणार्या आ.अमोल मेटकरी या नव्या चेहर्याला विधान परिषदेवर संधी दिली. त्याच धर्तीवर साखर कारखान्याच्या माध्यमातुन योग्य भाव देत सहकारात पारदर्शी कारभार करीत, शैक्षणिक संस्थेत योगदान देणार्या अरुण लाड यांना पक्षाने संधी दिली पाहिजे. भाजपच्या लाटेत दबावाला, अमिशाला बळी न पडता प्रचंड आशावादी, आम्ही राष्ट्रवादी, म्हणत विधानसभा,लोकसभा निवडणुकींत पक्षाचा आदेश मानुन पक्षीय काम चांगल्या पधदतिने चालविले. त्यामुळे पुणे पदविधरसाठी राष्ट्रवादीच पक्षीय रिसिट मिळवुन अरुण लाड महआघाडीचा नविन अभ्यासक्रम घेऊन आमदारकीच्या आखाड्यात उतरुन ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ही धुन पलूस-कडेगाव मतदारसंघांत घुमविणार का ? हे आगामी काळच सांगु शकेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








