प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी गेंल्या 24 तासांत 126 जण कोरोनामुक्त झाले. तर 67 नवे रूग्ण दिसून आले. कोरोनामुक्त आणि नव्या रूग्णांची संख्या घटल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत कोरोनामुक्तांची संख्या 41 हजार 280 आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजारांपर्यत पोहोचली आहे. दिवसभरात 443 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 233 जणांची अँटीजेन टेस्ट केली. गेल्या 24 तासांत कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी तालुक्यात एकही नवा रूग्ण मिळून आलेला नाही.
जिल्ह्यात मंगळवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 443 जणांची तपासणी केली. सध्या 4 हजार 99 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 409 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 380 निगेटिव्ह तर 28 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 233 रिपोर्ट आले. त्यापैकी 25 पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये दत्त कॉलनी कणेरी करवीर येथील 75 वर्षीय महिला, तासगाव सांगली येथील 60 वर्षीय पुरूष, अडकूर चंदगड येथील 77 वर्षीय पुरूष आणि बोरीवडे पन्हाळा येथील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटल्समध्ये सन सिटी नागाळा पार्क कोल्हापूर येथील 66 वर्षीय महिला, मजरे कार्वे चंदगड येथील 82 वर्षीय पुरूष,शांतीनगर पाचगाव करवीर येथील 70 वर्षीय पुरूष, राजाराम रोड टाकाळा कोल्हापूर येथील 66 वर्षीय पुरूष, अकबर मोहल्ला सोमवार पेठ कोल्हापूर येथील 68 वर्षीय पुरूष, व्हन्नाळी कागल येथील 73 वर्षीय पुरूष आणि चिंचवाड करवीर येथील 53 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यत 1 हजार 569 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 760, नगरपालिका क्षेत्रात 329, महापालिका क्षेत्रात 351 तर अन्य 129 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 126 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 41 हजार 280 झाली आहे. आजरा 1, भुदरगड 2, चंदगड 2, गगनबावडा 1, हातकणंगले 3, करवीर 11, पन्हाळा 2, राधानगरी 1, शिरोळ 4 नगरपालिका क्षेत्रात 8, कोल्हापूर शहर 27 आणि अन्य 5 असे 67 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleपेठ वडगाव पोलिसांची मटका घेणाऱ्यावर कारवाई, चारजणांवर गुन्हा
Next Article अखेर गांधीनगरमधील भिशीचालक महिलेवर गुन्हा दाखल









