करावा लागतोय अनेक अडचणींचा सामना
प्रतिनिधी / रत्नागिरी
दापोली तालुक्यातील आसुद येथील कोरोना सर्वेबाबत आशा सेविका हैराण झाल्या आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत आसुद वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आसुद यांना पत्र दिले आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजने अंतर्गत सर्वे करताना आसुद येथील आशा सेविकांना अनेक अडचणी आल्या. त्यांना देण्यात आलेले ऑक्सीमीटर दोन दिवसात बंद पडले आहेत. ग्रामपंचायतने ऑक्सीमीटर दिले नाहीत वारंवार मागणी करुनही अशा सेविकांना याबाबत टोलवले जात आहे. यामुळे आशा सेविका हैराण झाल्या आहेत.









