आमदार गोपीचंद पडळकरांचे भाजपच्यावतीने कुरुंदवाडीत आंदोलन
प्रतिनिधी / आटपाडी
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज बिरोबा मंदिर कुरुंदवाडी येथे आंदोलन केले.
आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथील मंदिरासमोर आमदार गोपीचंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती, ब्रम्हानंद पडळकर, ज्येष्ठ नेते नारायण चवरे, बाजार समिती उपसभापती दिलीप खिलारी, विभुतवाडीचे सरपंच चंद्रकांत पावणे, आप्पासाहेब भानुसे, कैलास वाघमारे, सचिन खिलारी, मोहन खरजे यांच्यासह भाविकांनी राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
राज्यात दारूची दुकाने सुरू करणारे सरकार मंदिरावर अवलंबून असलेल्या लोकांचा विचार करत नाही, ही शोकांतिका असल्याची भावना आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली.








