साहित्य : 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी साखर, अर्धी वाटी अनसॉल्टेड बटर, पाव चमचा मीठ, 1 चमचा जिरं, 2 चमचे दूध
कृती : ओव्हन 180 डिग्री तपमानावर प्रिहीट करावे. बेकिंग ट्रे वर जिरं पसरवून चार मिनिटे ठेवावे. आता बाऊलमध्ये अनसॉल्टेड बटर आणि साखर मिक्स करून चांगले फेटून घ्यावे. यासाठी हँड मिक्सरचा वापर करू शकता. मिश्रण चांगले फेटले की त्यात चाळणेने चाळलेले गव्हाचे पीठ, मीठ आणि थोडेसे बेक केलेले जिरे घालून मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यावे. मिश्रण चांगले एकजीव झाले की त्यात दूध घालून मिश्रण मिक्स करून त्याचा गोळा मळावा. आता पोळपाटावर थोडे गव्हाचे कोरडे पीठ पसरवून तयार गोळय़ाची गोलाकार पोळी लाटावी. त्यावर राहिलेले जिरे टाकून हातानेच हलक्यावर दाब द्यावा. नंतर कुकीज कटरच्या सहाय्याने गोलाकार कुकीज कट करावे. तयार कुकीज बेकिंग ट्रेवर ठेवून ओव्हन 180 डिग्रीवर दहा मिनिटे ठेवावे. नंतर 160 डिग्री तपमानावर ठेवून कुकीज पाच ते सहा मिनिटे ठेवून बेक करावे. आता तयार कुकीज गार झाले की खाण्यास द्या.