प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे.मात्र, राज्यभरातून सर्वांनीच एकदम निकाल पहाण्यासाठी त्या वेबसाईटवर गेल्याने ती वेब साईटच हँग झाली आहे.त्यामुळे पालकवर्ग निकाल पाहण्यासाठी सैरभैर झाल्याचे जिह्यात चित्र निर्माण झाले आहे.
राज्यात घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला.निकाल जाहीर होताच पालकांनी आपल्या मुलांचा निकाल पाहण्यासाठी त्या वेब साईट वर भेट दिली असता वेब साईट ओपन होत नसल्याचे पालकांच्या बाब निदर्शनास आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सातारा जिह्यात पालक आपल्या विध्यार्थीचा निकाल पाहण्यासाठी सैरभैर झाले आहेत.याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता सगळ्याच पालकांनी एकदम त्या वेबसाईटवर भेट दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.काही अडचण येणार नाही.सगळ्यांना निकाल पहाता येणार आहे, असे सांगण्यात आले.









