ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 79 लाख 91 हजार 998 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 19 हजार 695 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत रविवारी 41 हजार 935 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. 79.91 लाख कोरोना रूग्णांपैकी 51 लाख 58 लाख 162 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 26 लाख 44 हजार 141 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 741 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 11 कोटी 84 लाख 86 हजार 898 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्निया, टेक्सासमध्ये सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 55 हजार 389 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 16 हजार 584 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 8 लाख 35 हजार 832 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 083 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 09 हजार 460 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 379 जणांचा मृत्यू झाला आहे.









