वाघवडेजवळील घटना, मृत कामगार उत्तर प्रदेशचा
प्रतिनिधी/ बेळगाव
वाघवडे, ता. बेळगाव जवळील एका कारखान्यात काम करताना ग्रायडिंग मशिनचे चाक तुटून छातीवर आदळल्याने उत्तर प्रदेशमधील एका कामगाराचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गुंडू कुर्बान मरहमअली (वय 33) मूळचा राहणार बस्तीपूर, उत्तर प्रदेश सध्या राहणार उद्यमबाग असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाघवडे येथील एकदंत इंडस्ट्रीज या कारखान्यात गुंडू काम करीत होता. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना मशिनचे चाक तुटून त्याच्या छातीवर आदळले. या घटनेत तो जागीच ठार झाला. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.









