ऑनलाईन टीम / लखनऊ :
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास उद्या (दि.12) पहाटे 5 वाजल्यापासूनआमरण उपोषणाला बसणार आहेत.
परमहंस दास म्हणाले, भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान व बांग्लादेशला मुस्लीम राष्ट्र घोषित करण्यात आले होते. देशात ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त आहे तिथे हिंदूंवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे बांग्लादेश आणि पाकिस्तान राहत असलेल्या हिंदूंना भारतात आणावे आणि भारतातील मुस्लिमांना पाकिस्तान व बांग्लादेशात पाठवून, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी दास यांनी केली आहे.
दास यांनी राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण केले होते.