सासनकाठी-मानकऱयांच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन साजरे करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाचा धोका असल्यामुळे प्रशासनाची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विजयादशमी दिवशी होणाऱया सीमोल्लंघनासाठी बेळगाव शहर देवस्थान कमिटी व चव्हाट गल्ली येथील देवदादा कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असा निर्णय सासनकाठी व मानकऱयांच्या बैठकीत घेण्यात आला.
पाटील गल्ली येथील सिद्ध-भैरवनाथ मंदिरात शनिवारी ही बैठक पार पडली. बेळगावची ऐतिहासिक परंपरा खंडित होणार नाही, तसेच प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळता येतील असा तोडगा काढावा, असे या मान्यकऱयांनी सांगितले.
या बैठकीला रणजित चव्हाण-पाटील, परशराम माळी, विजय तमूचे, लक्ष्मण नाईक, राहुल जाधव, बाळू मोरे, प्रमोद बिर्जे, श्रीनाथ पवार, अभिजित आपटेकर, सुनील जाधव, गणेश दड्डीकर यांच्यासह इतर उपस्थित होते.









