वार्ताहर / औंध
कालव्याची दुरुस्ती करून नेर तलावातून रब्बी हंगामाकरीता पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजी सभापती संदीप मांडवे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेर धरणक्षेत्रात यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र नागाचे कुमठे, नायकाची वाडी, सिध्देश्वर कुरोली, धकटवाडी, आदी परिसरात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. लाभक्षेत्रात वरील गावांचा समावेश आहे. मात्र शेवटच्या टोकावरील गावापर्यंत धरणाचा पाणी पोहचत नसल्याने ही गावे शेतीपाण्यापासून वंचित रहात आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून कुमठे, नायकाची वाडी गावांना नेर कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळालेले नाही. तरी यंदाच्या रब्बी हंगामासाठी कालव्याची दुरुस्ती करुन पाणी मिळावे याकरिता संबधीत विभागाला पाणी सोडण्यासाठी आदेश व्हावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









