प्रतिनिधी / चिपळूण
चिपळूण तालुक्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांत तनाळी – बौध्दवाडीतील एका प्रौढाने आजारपणाला कंटाळून सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन, तर शहरातील पाग – रानडेआळीत विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तनाळी – बौध्दवाडीतील अनंत दगडू कदम ( 31, तनाळी-बौध्दवाडी ) यांनी आजारपणाला कंटाळून शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद दर्शना दगडू कदम (55, तनाळी-बौध्दवाडी) यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक लालजी यादव करीत आहेत.
विवाहितेची आत्महत्या शहरातील पाग – रानडे आळीतील विवाहिता पिती संदेश गोरिवले (25, पाग-रानडेआळी, चिपळूण ) यांनी घरात गळफास घेऊन शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद ओंकार राजेंद्र सावंत ( पाग-रानडेआळी ) यांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. एल. चव्हाण करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









