साहित्य : 2 वाटी नुडल्स, 2 कांदे बारीक चिरून, 3 चमचे टोमॅटो केचप, चवीपुरते मीठ, पाव चमचा काळीमिरी पावडर, 4 चमचे सिमला मिरची छोटे तुकडे करून, 1 वाटी मैदा, 4 चमचे गाजर किसून, 3 चमचे नुडल्स मसाला पावडर
कृती : बाऊलमध्ये मैदा, मीठ आणि एक चमचा तेल टाकून मिक्स करावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून चपातीच्या पीठाप्रमाणे गोळा मळावा. चमचाभर गरम तेलात गाजर, सिमला मिरचीचे तुकडे आणि कांदा टाकून मिश्रण परतवावे. नंतर त्यात सोयासॉस, मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिश्रण परतवावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि नुडल्स मिक्स करावे. नंतर टोमॅटो केचप आणि नुडल्स मसाला मिक्स करून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतवून आच बंद करावी. आता मैद्याचे मध्यम आकाराचे गोळे करून गोलाकार पुरी लाटावी. त्याच्या मधे चमचाभर नुडल्सचे सारण ठेवून घडी दुमडावी. मैद्याची पेस्ट लावून कडा बंद कराव्यात. तयार रोल गरम तेलात सोनेरी रंगावर तळून सॉससोबत खाण्यास द्या.