ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताने आज पूर्व किनारपट्टीवर सुखोई-30 लढाऊ विमानांमधून ‘रुद्रम’ किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केले आहे.
‘रुद्रम’ हे भारतात बनवलेले असे पहिले मिसाईल आहे की ते कितीही उंचीवरून डागले जाऊ शकते. हे मिसाईल कोणत्याही प्रकारचा सिग्नल आणि किरणोत्सर्ग पकडू शकते. शत्रूचे क्षेपणास्त्र आपल्या रडारवर आणून ते क्षेपणास्त्र नष्ट करू शकते.









