प्रतिनिधी/ सातारा
पुणे येथे पत्रकार परिषदेत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे यांच्याबाबत वक्तव्य करताच त्याचे पडसाद सातारा जिह्यात उमटले. प्रकाश आंबेडकर यांचा उदयनराजे प्रेमींनी निषेध करत जशास तसे उत्तर देत सातारा शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.
सातारा शहरात प्रकाश आंबेडकर यांच्या निषेध करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी, संदीप शिंदे, नितीन शिंदे, संतोष घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील काटकर म्हणाले, वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाश आंबेडकर.आपल्या माहिती असेल वादग्रस्त विधान करण्यात ते नेहमी पटाईत असतात.छत्रपती उदयनराजे हे सगळ्या राज्याचे आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत.आज प्रकाश आंबेडकर यांनी जे अपशब्द वापरले.तो शब्द त्यांनाच लागू होतो.कारण बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून ज्या वेळेला तुम्ही पुढे होऊन काम करता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जगात आदराचे स्थान आहे.त्यांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांच्यावर खालच्या भाषेत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.त्यांनी जर येथून पुढे जर अशा पद्धतीचे वक्तव्य केले तर त्यांना सातायातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात जशास तसं उत्तर उदयनराजे प्रेमी आणि राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते देतील,
बाळासाहेब गोसावी म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच विचार करावा, तुम्हाला कोणत्याही पक्षाने आजपर्यंत खासदारकी दिली नाही. आपण विचारवंत आहात पण बोलताना आपल्या बुद्धीची कीव करावी वाटते.प्रकाश आंबेडकर हे स्वतःला वंचितचे नेते समजतात. मी असेन, संदीप शिंदे असतील रंजना रावत असतील आम्हाला वंचीतने कधी न्याय दिला नव्हता परंतु खासदार उदयनराजे यांनी न्याय दिला आहे.उदयनराजे यांनी कधीच जाती धर्माचे राजकारण केलं नाही.त्यांनी सातारच्या कार्यकर्त्यांनी सांगावं की जलमंदिर पहा, महाराजांच्या कोणीही गेल्यानंतर तो कोणत्या जातीचा आहे.कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिलं जातं नाही. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी केव्हाही काम करताना तू माझ्या गटाचा आहेस का, आंबेडकर गटाचा आहे का हे विचारतात. विचार करून कामाची पध्दत आहे अशा वाचाळवीर प्रकाश आंबेडकर यांनी सातारा येथे यावे आम्ही त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करू
रंजना रावत म्हणाल्या, आताच न्यूजमध्ये पाहिले कोणीतरी आंबेडकर व्यक्ती ज्यांना समाजामध्ये काहीच किंमत नाही अशी व्यक्ती छत्रपती उदयनराजे यांच्यावर बोलले आहेत.त्यांना सातायात पाय ठेवू देणार नाही, त्यांची गाडी फोडू, असा इशारा दिला.
सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही-शंभूराज देसाई
मंत्री शंभूराज देसाई यांनी कडक शब्दात प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत कडक प्रतिक्रिया दिली.ते मीडियाशी बोलताना म्हणाले, मला आताच माहिती मिळाली.छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आमच्या सगळ्यांचे आदर्श श्री.छ.उदयनराजे यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.ती निंदनीय आहे.त्याची जेवढी निंदा करता येईल तेवढी कमी आहे.शेवटी छत्रपतींच्या घराण्याला, छत्रपतींच्या गादीला संपूर्ण महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे.मला एक सांगायचे आहे आंबेडकर साहेबांना दोन्ही ही छत्रपतीनी आरक्षणा संदर्भात सातारच्या आणि कोल्हापूरच्या गादीने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.अस असताना आंबेडकर साहेबांसारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांच्यावावर टीका करणे हे निश्चितपणे गैर आहे चुकीचे आहे.आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदार यांच्यावर केलेली टीका आम्ही कधी ही सहन करणार नाही.मला आंबेडकर साहेबांना एवढंच म्हणायचे आहे आरक्षणा संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडतोय,शासनाकडे पाठपुरावा करतो आहे आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाचा कशासाठी बोलले माहीत नाही पण सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. मी 2014 ते 2019 या दरम्यान आमदार असताना महाराजांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला होता.मी विधानसभेच कामकाज बंद पाडल होत.
श्रीकांत आंबेकर यांनी पत्रकाद्वारे केला निषेध
नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांनी आज खासदार श्री.छ.उदयनराजे यांच्यावर बेताल वक्तव्य केले आहे.त्यांना हे शोभत नाही.जर प्रकाश आंबेडकर यांना डोके असते तर राजकारणात फार मोठे स्थान मिळाले असते.आणि त्याचा समाजबांधवांना फार मोठा फायदा झाला असता परंतु दुर्दैवाने त्यांना कोणी विचारत नाही.याउलट खासदार उदयनराजेंना तमाम मराठा समाज आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी मागे लागला आहे.देशातील सर्व पक्ष सुद्धा खासदार उदयनराजे हे आपल्या पक्षात असावेत प्रयत्न करत असतात हे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात ठेवावे अशी प्रतिक्रिया नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी दिली.









