शिव यादव यांनी दिल्लीच्या तख्तावर झेंडा फडकवला
औंध/वार्ताहर
राष्ट्रीय खुल्या ऑनलाईन फिटनेस चँम्पियनशिप स्पर्धेत सातारचे क्रीडामार्गदर्शक शिव यादव यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत संपूर्ण देशात 2500 स्पर्धकातून अव्वल स्थान पटकावून सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे.
राज्याच्या क्रिडा युवक सेवा संचनालय यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर खुली अँथलेटिक्स फिटनेस आँनलाईन चँम्पियन शिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील 2500 क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, ट्रेनर,सहभागी झाले होते. या स्पर्धेत सातारच्या शिव स्पिरीट टिमचे क्रीडा मार्गदर्शक शिव यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याचे क्रीडा राज्यमंत्री आदीती तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यांना रोख 75 हजार रुपये बक्षीस प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
शिव यादव यांनी आपल्या कर्तबगारीने राष्ट्रीय स्तरावर सातारचा नावलौकीक वाढवल्यामुळे त्यांचा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव,राजेंद्र अतनुर, सुनील कोळी, संदीप शिंदे,जयंत शिवदे,अनिरुद्ध पोतदार, डॉ सुधीर पवार उपस्थित होते.









