प्रतिनिधी/ पणजी
महिलांचे फोटो विकृत किंवा अश्लील करून सोशल मिडीयावर अपलोड करणाऱया संशयिताला सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत दोन पीडित महिलांनी तक्रार दाखल केली होती. संशयिताच्या विरोधात 67 आयटी कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशय़िताचे नाव लिसॅन्डर लुईस मोन्तेरो (ताळंगाव) असे आहे. संशयितांने इन्स्टांग्रामवर बनावट खाते उघडले होते. त्याखात्याद्वारे पीडित महिलंचे प्रोफाईल फाटो मिळविले व नंतर त्यांना अश्लील स्वरूप देऊन सोशल मिडीयावर अपलोड केले होते. ही कारवाई उपिरीक्षक देवंद्र पिंगळे व त्यांच्या टीमने केली आहे.
सोशल मिडीयावर अपलोड केलेल्या फोटोंचे दुरुपयोग होत असल्याचे आत्तापर्यंत उघड झाले असून आत्तापर्यंत अशा प्रकारच्या तक्रारींचा तपास केला आहे.