प्रतिनिधी / हुपरी
हुपरी येथील माळभागातील तीन नगराच्या मध्य ठिकाणी शासनाचा नियम धाब्यावर बसवून नगरपरिषदेची व कोणाचीही परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभे करण्याचे काम चालू आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने ते ताबडतोब थांबवावे अन्यथा वाळवेकरनगर मधील रहिवाशी आंदोलन करणार असल्याचे निवेदन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांना दिले.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील होळकरनगर, खेमलापुरेनगर आणि वाळवेकरनगर या तीन नगरांच्या मध्यभागी गट नंबर 919 मध्ये नगरपरिषद व कोणाचीही परवानगी न घेता मिळकतधारकांच्या संमतीने मोबाईल टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे. शासनाचा नियम असा आहे की शाळा, मंदिर अथवा दवाखाना जवळपास असेल तर मोबाईल टॉवर उभे करू नये. टॉवरमुळे लहान मुले आजारी नागरिक यांना कमी प्रतिकार शक्ती असल्यामूळे किरणोत्सवाचा त्रास होतो. तरी या तीन नगरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका होईल अशा प्रकारे त्यांच्या जीवाशी जाणून बुजून खेळ खेळण्याच्या प्रयत्न करू नका.
तीन नगरात शाळा, दवाखाने, दूध डेअरी आणि छोटी छोटी दुकाने यांचा समावेश आहे. तरी होळकरनगरमधील गट नंबर 919 मधील मिळकतमध्ये उभे करण्यात येत असलेले मोबाईल टॉवर ताबडतोब थांबवावे याकरिता वाळवेकरनगर मधील नागरिकांनी हुपरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांना परवानगी न देण्याचे व ताबडतोब बंद करण्याचे निवेदन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









