बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्यमुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री सर्वाधिक कोरोना प्रकरणे असणाऱ्या राज्यातील ११ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी मख्यमंत्री एकूणच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन चर्चा करतील.
मुख्यमंत्री बळ्ळारी, दक्षिण कन्नड, हसन, धारवाड, बेळगाव, म्हैसूर, शिवमोगा, तुमकूर, उडुपी, उत्तर कन्नड आणि बेंगळूर शहर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हंटले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या सात दिवसांत कर्नाटकात ५५,९३८ रुग्ण आढळले आहेत.