वार्ताहर / हिंडलगा
हंगरगे येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्या हंगरगे शाखेतर्फे ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना डेंग्यू आणि चिकुनगुनिया रोगप्रतिबंधक लसीचे वितरण करण्यात आले. येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित लसीकरण शिबिराला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी आशा कार्यकर्त्या आणि श्रीराम सेना शाखेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, निवृत्ती तरवाळ, यल्लाप्पा पाटील, साईनाथ कंग्राळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.









