साहित्य : अर्धी वाटी ओट्स पावडर, पाव वाटी तांदळाचे पीठ, पाव वाटी रवा अथवा गव्हाचे पीठ, पाव वाटी दही, चवीपुरते मीठ, 2 हिरवी मिरची चिरून, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 कढीपत्ता पाने बारीक चिरून, अर्धा चमचा आलं पेस्ट, आवश्यकतेनुसार पाणी, तेल आवश्यकतेनुसार
कृती : बाऊलमध्ये ओट्स पावडर घेऊन त्यात तांदळाचे पीठ, रवा अथवा गव्हाचे पीठ, मीठ, हिरवी मिरची, जिरं, कांदा, कढीपत्ता आणि आलं पेस्ट घालून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात दही घालून मिश्रण मिक्स करावे. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण डोशाच्या पीठाप्रमाणे बनवून पंधरा मिनिटे अथवा अर्धा तास झाकूण ठेवावे. आता मिश्रण पुन्हा मिक्स करून त्यात मीठ घालावे. गॅसच्या मंद आचेवर डोसा तवा गरम करून त्यावर तेलाचे थेंब टाकून पसरवावे. नंतर त्यावर तयार डोशाचे मिश्रण वाटीने गोलाकार न फिरवता घालावे. कडेने तेलाचे थेंब सोडून डोसा लालसर रंगावर भाजावा. आता तयार ओट्स डोसा चटणीसोबत खाण्यास द्या.









