सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी तेजस्वी सातपुते
प्रतिनिधी / सातारा
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची आज बदली होऊन त्या सोलापूर ग्रामीणला अधिक्षक म्हणून बदलून गेल्या तर त्यांच्या जागी गडचिरोली येथुन अजयकुमार बन्सल हे सातारा पोलीस अधीक्षक म्हणून आले. तेजस्वी सातपुते यांना दीड वर्षे सातारा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या करिता पोलीस कवायत मैदान येथे चैतन्य हॉस्पिटल सूरु केले. तसेच कोरोना काळात प्रत्येक पोलिसांच्या पाठीमागे खंबीरपणे कुटूंब प्रमुख म्हणून त्या उभ्या राहिल्या होत्या. तसेच कायदा, सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांनी नियोजन बद्द काम केले. गंभीर गुन्हे उघडकीस आणले. गुन्हेगारांना जरब बसवला. त्यांच्या जागी आलेले अजयकुमार बन्सल हे गडचिरोली येथून आले आहेत. सातारला गडचिरोली येथून येणारे हे तिसरे एसपी आहेत.
Previous Articleबेंगळूरमध्ये कोरोनाचा उच्चांक
Next Article मॅट फसवणूक प्रकरणी नुकसान भरपाई दावा करणार









