बुधवार 7 ते मंगळवार 13 ऑक्टोबर 2020
राहू-केतू बदलाचा जागतिक परिणाम
संपूर्ण जगावर आमूलाग्र बदल घडवणारे ग्रह म्हणजे राहू-केतू. गेल्या पन्नास-साठ वर्षातील घटनांचा क्रम पाहिल्यास या राहू-केतूनी किती गोंधळ घातलेला आहे, याची प्रचिती येते. ज्यावेळी वृषभेत राहू व वृश्चिकेत केतू येतो, त्यावेळी हे दोन ग्रह जीवनात संपूर्ण बदल घडवितात. पूर्वीचे जीवनमान बदलून नवनव्या गोष्टी घडतात. तसेच अकल्पित घटना, अंतर्गत सुरक्षा, देशांतर्गत गृहकलह इत्यादी गोष्टींचे प्राबल्य वाढते. जगाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची स्थित्यंतरे घडलेली आहेत. 1947 साली राहू वृषभ राशीत असताना देशाला स्वातंत्र्य मिळाले व ब्रिटिश साम्राज्य कोसळले. देशावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. मोठय़ा प्रमाणात रक्तपात झाला होता. भारताच्या सीमा बदलल्या, नवीन नवीन कायदे, नवीन समाजजीवन उदयास आले. 1966 मध्ये वृषभ राशीत राहू असताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे घातपाती मृत्यू झाला. अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांचाही घातपातात मृत्यू झाला. 1984 मध्ये पुन्हा याच राहू-केतूमुळे भोपाळ गॅसदुर्घटना घडली. त्यात प्रचंड मनुष्यहानी व अनेकांना भयानक अपंगत्व आले. पुन्हा अठरा वर्षांनी 2002 मध्ये गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड झाले. प्रचंड अराजकता माजली. दंगली व भीषण रक्तपात झाला. मुंबई बेस्टमध्ये बॉम्बस्फोट झाला. या साऱया घटनांकडे बारकाईने पाहिल्यास त्या राहू कृतिका व केतू अनुराधा नक्षत्रात असताना घडलेल्या आहेत. नेमकी तशीच परिस्थिती 5 ऑक्टोबर 2021 ते 9 फेब्रुवारी 2022 या कालखंडात येत आहे. या काळात सर्वच जागतिक राजकारणातील नेत्यांनी तसेच इतरांनाही अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात ज्या काही घटना घडतील, त्यांचे अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत. अजून वर्षभर वेळ आहे पण, तरीही लोकांनी सावध राहावे म्हणून ही सावधगिरीची सूचना करण्यात येत आहे. यावषी सप्टेंबरला राहू-केतू बदललेले आहेत. आगामी दीड वर्षात सर्वच राशीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे परिवर्तन घडणार आहे. त्यात चांगले असेल अथवा वाईट देखील असेल. त्यामुळे कितीही गंभीर प्रसंग आले तरी खून, मारामाऱया, दंगली, गोळीबार, मोठे अपघात, रक्तपात, लढाया, भ्रष्टाचार यापासून शक्मयतो दूर रहा. संकटे ही कधीही सांगून येत नसतात. त्यामुळे सर्वांनीच सावधगिरी बाळगणे अतिआवश्यक समजावे.
मेष –
अडलेली सरकारी कामे पूर्ण होऊ लागतील. .आर्थिक बाबतीत उत्तम. कोर्टकचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. आर्थिक बाजू मजबूत राहील, पण काही अचानक निघणारे खर्च चिंताजनक असतील. कुणाच्याही कोणत्याही प्रकरणात मध्यस्थी करू नका. अन्यथा मानहानी होईल. नोकरीत अधिकारी वर्गाचे मन सांभाळावे लागेल. संकटे आली तरी प्रयत्न व चातुर्याने सर्व कामे यशस्वी होतील.
वृषभ –
घरात नव्या वस्तूंची खरेदी होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम लाभ. किरकोळ कारणांवरून भांडणे होऊ शकतात. गरज नसलेल्या कामात निष्कारण वेळ घालवाल. एखादी वस्तू चोरीला जाण्याची शक्मयता. महत्त्वाच्या कामाच्यावेळी नातेवाईक मंडळी ऐनवेळी पाठ फिरवण्याची शक्मयता. राजकीय क्षेत्रात असाल तर अनेक नव्या जबाबदाऱया पडतील. काही जणांना उच्च पद मिळेल.
मिथुन –
शारीरिक कष्ट आणि व्याधी वाढतील. एकाच वेळी अनेक कामामुळे मानसिक गोंधळ होईल. अधिकारीवर्ग तुमच्या कामाची प्रशंसा करतील, पण त्याचा फायदा होणे कठीण. एखाद्या कामासाठी राखून ठेवलेला पैसा दुसऱयाच कारणासाठी खर्च होईल. राहूचे भ्रमण अनिष्ट आहे. सर्व तऱहेने काळजी घ्या.
कर्क –
अपेक्षा नसलेल्या ठिकाणाहून काहीतरी फायदा होण्याची शक्मयता. नवीन ओळखी होतील. हाती पैसा खेळू लागेल. मानसिक समाधान देणारी घटना. पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्वी कधीतरी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ या आठवडय़ात होऊ शकेल.
सिंह –
आर्थिक स्थिती भक्कम राहील. नोकरी व्यवसायातील ताण-तणाव कमी होतील. प्रेमप्रकरण असेल तर यशस्वी. उत्तरार्धात अप्रिय घटना, किरकोळ अपघात, वादा-वादी,अफाट खर्च असे अनुभव येतील. पण हाती घेतलेल्या उद्योगात फायदा.
कन्या –
सतर्क राहून सर्व कामे करा. राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. पैशाची आवक वाढेल. तुमची प्रगती बघून काही जणांना पोटदुखी सुरू होईल. त्यामुळे आपली कमाई व आपला खर्च यांचा थांगपत्ता कुणालाही लागू देऊ नका. या आठवडय़ात अनेक महत्त्वाची कामे मिळतील, त्यामुळे उत्साह वाढेल.
तूळ –
पैशासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. हाती घेतलेल्या कामात अपेक्षेपेक्षाही अधिक चांगले यश मिळेल. संकल्प सिद्धी. संकटाच्या वेळी मित्रमंडळी ऐनवेळी धावून येतील. नोकरीत वरि÷ांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. जागे संदर्भातील कामे होतील.
वृश्चिक –
घरात मंगलकार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. अपेक्षित जोडीदाराशी लग्न ठरण्याची शक्मयता. कुठे गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होईल. पण फसव्या योजनांपासून दूर राहा. मोबाईल दुसऱयांना वापरण्यास देऊ नका. कुठेतरी अडकु शकाल. एखादे जुने वाहन घेण्याचा विचार कराल, पण त्या भानगडीत पडू नका.
धनु –
काही कामे आत्मविश्वासाने केल्यास नक्कीच पूर्ण होतात व दुसऱयावर विसंबून राहील्यास नक्कीच तोटा होतो, याचा अनुभव येईल. आर्थिक अडचण पडणार नाही. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. शत्रुत्वभावना बाळगणारे आपण होऊन चांगले वागू लागतील. ध्यानीमनी नसता अचानक प्रवास घडतील.
मकर –
कष्ट आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर कोणतेही काम यशस्वी करून दाखवाल. हातून गेलेला अधिकार परत मिळेल. तुम्हाला त्रास देणारे आपण होऊन तुमच्या मार्गातून दूर होतील. नव्या योजना कार्यान्वित कराल. कामे सोडून गेलेल्या काही जणांची कामे तुम्हाला करावी लागतील. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग दिसतील.
कुंभ –
नोकरी करत असाल तर उच्च अधिकारी काहीतरी खुसपट काढून त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कमाईपेक्षा खर्च वाढेल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. जे काम तातडीचे आहे, त्याकडे विशेष लक्ष द्या. कोणी कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या हातून काहीतरी भव्यदिव्य असे कार्य या आठवडय़ात होऊ शकते.
मीन –
एखाद्याची कॉपी केली म्हणजे तसेच यश मिळेल, असे नसते. तुम्ही हुशार व कर्तबगार आहात. कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्मय नाही, हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अशक्मय गोष्टीही सहज साध्य करू शकाल. सध्या काही कारणांमुळे तुमचे आत्मबल कमी झालेले आहे ते वाढवा.