प्रतिनिधी/शाहुवाडी
सरूड (ता. शाहूवाडी) येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरूड येथील अज्ञात इसमाने अज्ञात कारण सांगून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत संबंधित मुलीच्या आईने अज्ञात इसमाचे विरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर चव्हाण याचा अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleहिंडलगा जेलच्या कार्यक्षेत्रात होणार दोन तलावांची निर्मिती
Next Article कृत्रिम शेल्टरमध्ये नानाविध माशांचा अधिवास









