लखनौ
समाजवादी पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य मुलायम सिंह यादव यांचे नुकतेच निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्हय़ातील मूळ गावी शनिवारी रात्री उशिराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. 1949 मध्ये ते पहिल्यांदा सरपंच बनले होते. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय होते. गेल्या बऱयाच काळापासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे तीनवेळा सदस्य होते. त्यांनी दोनवेळा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.









