ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 61 हजार 267 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 884 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 083 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 03 हजार 569 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 19 हजार 023 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 89 हजार 403 कोरोना चाचण्या सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या.









