सांगली जिल्ह्यातील 21 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 62 वाढलेः ग्रामीण भागात 281 रूग्ण वाढलेः
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील सोमवारी कोरोनाचे नवीन 343 रूग्ण आढळून आले. 660 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचार सुरू असताना 21 जणांचा मृत्यू झाला. जिल्हÎातील एकूण रूग्णसंख्या 39 हजार 160 झाली आहे. तर उपचारातील रूग्ण संख्या 5 हजार 756 इतकी आहे. आजअखेर एक हजार 443 रूग्णांचे बळी गेले आहेत.
मनपा क्षेत्रात 62 रूग्ण वाढले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. गेल्या काही दिवसपासून ही रूग्णसंख्या 100 च्या आतमध्ये आली आहे. सोमवारी अवघे 62 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 49 तर मिरज शहरात 13 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार 77 रूग्णसंख्या झाली आहे.
ग्रामीण भागात 281 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्राबरोबरच आता ग्रामीण भागातही रूग्णसंख्या घटत चालली आहे. सोमवारी ग्रामीण भागात नवीन 281 रूग्ण आढळून आले आहेत. तालुकानिहाय वाढलेले रूग्ण असे आटपाडी तालुका 21, जत येथे 14, कडेगाव येथे 24 तर कवठेमहांकाळ येथे 20 नवीन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 32 तर मिरज तालुक्यात 28 रूग्ण वाढले. पलूस येथे 27, शिराळा येथे 14, तासगाव येथे 35 आणि वाळवा तालुक्यात 66 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात सोमवारी एकाच दिवशी 281 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 21 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना 21 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात एक आणि मिरज शहरात दोघांचे मृत्यू झाले आहेत. जत तालुक्यात दोघांचे तर कडेगाव तालुक्यात एकाचा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात तिघांचे मृत्यू झाले आहेत. खानापूर तालुक्यात दोघांचा मिरज तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यात एकाचा, शिराळा तालुक्यात दोघांचा तर वाळवा तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी एकाच दिवशी 21 जणांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 443 रूग्णांचे बळी गेले आहेत.
दोन हजार 719 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हÎात सोमवारी एकाच दिवशी दोन हजार 719 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीमध्ये 895 रूग्णांचे स्वॅब तपासले आहेत. तर रॅपीड ऍण्टीजन मध्ये एक हजार 824 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. या दोन्ही तपासणीमध्ये नवीन 343 रूग्ण आढळून आले आहेत.
परजिल्हÎातील नवे तीन रूग्ण वाढले
जिल्हÎात परजिल्हÎातील रूग्णांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी परजिल्हÎातील नवीन तीन रूग्ण वाढले त्यामध्ये कोल्हापूर जिल्हÎातील दोन आणि बेळगाव जिल्हÎातील एकाचा समावेश आहे. परजिल्हÎातील आजअखेर एक हजार 233 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये 909 रूग्ण बरे झाले आहेत. तर 144 रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. आजअखेर 180 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
660 रूग्ण कोरोनामुक्त
सोमवारी जिल्हयातील 660 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आजअखेर जिल्हÎातील 31 हजार 961 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. वाढणाऱया रूग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱया रूग्णांची संख्या वाढत चालल्याने जिल्हÎातील रिकव्हरी रेट वाढला असून तो आता 80 टक्केच्यावर गेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून वाढणाऱया रूग्णापेक्षा बरे होणारे रूग्ण वाढत चालल्याने जिल्हÎाला चांगला दिलासा मिळत चालला आहे.
आजचे नवीन रूग्ण 343
उपचारातील रूग्ण 5756
बरे झालेले रूग्ण 31961
एकूण रूग्ण 39160
आजअखेर बळी 1443








