प्रतिनिधी/आटपाडी
करगणी ग्रामपंचायतने सरपंच गणेश खंदारे व सहकारी यांच्या पुढाकारातून प्राथमिक आरोग्य केंद्राला 4 ऑक्सिजन मशीन, सॅनिटायझर, मास्क, रेबीज लस व आरोग्य साधने प्रदान केली. 14व्या वित्त आयोगातून लोकांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे जेष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, तानाजीराव पाटील यांनी कौतुक केले.
करगणी जिल्हा परिषद गटातील सर्व गावतील लोकांच्या आरोग्याची काळजी करगणी प्राथमिक आरोग्य केंद्र घेत आहे. या आरोग्य केंद्रात करगणी गावातील व परिसरातील कोरना संसर्ग चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. माजी जि. प. सदस्य तानाजीराव पाटील, अण्णासाहेब पत्की, सरपंच गणेश खंदारे, माजी चेअरमन दत्तात्रय पाटील, माजी सरपंच विजयसिंह सरगर, पांडुरंग सरगर , माजी सरपंच तुकाराम जानकर, साहेबराव पाटील , रासप तालुका अध्यक्ष लक्ष्मण सरगर, सत्यशिल सवणे, ग्रामविकास अधिकारी उत्तमराव पाटील, डॉ. चवरे, डॉ,गावडे, अभयसिंह पोकळे, चंद्रकांत सरगर, शामराव माने, विलास जगदाळे ,सुरेश माने ,जयदीप दबडे, रमेश माने , मच्छिंद्र पुजारी ,जालिंदर दबडे , शशिकांत बदडे ,पप्पू पाटील, तुकाराम निळे, राहुल सवने, सुमित दबडे, वैभव गेंड इतर मान्यवर, ग्रामस्थानी करगणी ग्रामपंचायत असा उपक्रम राबविणारी पहिली ग्रामपंचायत असल्याचा अभिमान व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








