प्रतिनिधी/जत
जत तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदीपात्रात पोहण्यास गेलेला चौदा वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. महानतेश कांबळे असे त्या मुलाचे नाव आहे. मित्रांसोबत तो सकाळी नदीपात्रात आंघोळी साठी गेला होता. त्यास पोहता येत नव्हते, तसेच नदीत पाणी ज्यादा असल्याने तो बुडल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, महानतेश अद्याप सापडला नाही. सांगलीहून पाणबुडी टीम बोलावण्यात आली आहे. घटनास्थळी उमदी पोलीस, ग्रामस्थ शोध घेत आहेत. परंतू नदीला पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








