प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरातील आय. टी. आय. परिसरात काहीजणांना बिबट्याचे दर्शन झालं आहे. येतील रहिवाशी कीर यांच्या घराच्या पडवीत गणशोत्सव काळात बिबट्या वावरून गेल्याची माहिती त्यांनी दिली नितीन कीर यांनी आय. टी. आय. च्या मागील कंपौंडच्या भिंतीवर बिबट्या बसल्याचे पाहिल्याचे सांगितले. नितीन कीर शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी याच परिसरतील आपल्या बागेत गेले असता त्यांना बागेतील झाडावर बिबट्याने अर्धवट खाल्लेले माकड अडकलेले देखील त्यांनी पहिले.
नितीन कीर यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पहाणी केली व लवकरच येथे कॅमेरे लावणार असल्याचे आश्वासान दिल्याचे कीर यांनी सांगितले. बिबट्याचा वावर आय टी आय परिसरातील जंगल भागात होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
Previous Articleसातारा शहरातल्या भटक्या कुत्र्यांचे होणार आता निरबीजिकरण
Next Article सातारा : इथं फुल म्हणून दगड वाहण्याची प्रथा









