राजापूर / वार्ताहर
वाहाळत खेकडे पकडत असताना पाण्यात पडलेल्या विजवाहिनीच धक्का बसून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील नाणार गावी घडली आहे. दिवाकर पुजारी (४२) व अथर्व पुजारी (१०) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिवाकर पुजारी हे आपल्या 10 वर्षाच्या मुलासह गावातील ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. याच ओढ्यावरून महावितरणची 11 केव्ही विजवाहिनी गेलेली आहे. या वाहिनीचा कंडक्टर तुटल्याने प्रवाहित विजवाहिनी ओढ्याच्या पाण्यात पडली होती. दुर्दैवाने पुजारी पितापुत्र याच ठिकाणी खेकडे पकडण्यासाठी गेले असता दोघांनाही विजेचा जबर धक्का बसून त्यातच दोघांचाही मृत्यू झाला..
या घटनेची खबर मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









