वारणानगर / प्रतिनिधी
बच्चे सावर्डे ता पन्हाळा येथील वारणा नदी पात्रता बांदल गवतफड येथे बाळकाबाई धर्मा कांबळे वय ८५ ( रा. थेरगाव ता. शाहूवाडी ) या वृध्द महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला.
या घटनेची नोंद कोडोली पोलिसात करणेत आली असून याबाबतची फिर्याद मुलगा जनार्दन कांबळे याने दिली आहे.या बाबत कोडोली पोलीसातून मिळालेली माहिती अशी, बाळकाबाई कांबळे या बुधवार दि. ३० रोजी सकाळी घरात कोणाला न सांगता बाहेर गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा परीसरात तसेच नातेवाईक यांचेकडे शोध घेतला परंतु त्या सापडल्या नाहीत. शुक्रवारी दि.२ रोजी सकाळी ११.३० वाजता बच्चे सावर्डे येथील बांदल गवतफड येथील नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याचा दिसून आला.
या घटनेची माहिती कोडोली पोलिसात देणेत आल्या नंतर कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला.
Previous Articleधनगर आरक्षणासाठी पाठपुरावा करणार
Next Article वैभववाडीत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला









