प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आणि मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप उर्फ नाना मयेकर यांचे कोल्हापूर येथे शुक्रवारी दुःखद निधन झाले.
रत्नागिरीमध्ये हे वृत्त समजताच साऱ्यांनाच धक्का बसला आहे. गेले चार दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्यांना कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नाना उर्फ दिलीप मुरारी मयेकर सुस्वभावी, अजातशत्रू असे व्यक्तिमत्व होते. नानांचा लोकसंपर्क दांडगा होता. राष्ट्रवादी रत्नागिरीमध्ये वाढवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा साऱ्या वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









