प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील 65 महसूल मंडळांपैकी केवळ 4 मंडळातील 371 शेतकऱयांना 38 लाख हजार प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आले, मात्र उर्वरित 61 महसूली मंडळातील 2369 शेतकरी विमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत़
बदलत्या हवामानामुळे शेतकऱयांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये आंब्याबरोबरच काजू पीकाचा समावेश करण्यात आला आह़े जिल्हय़ात हवामान मोजण्याचे उपकरण महसूल मंडलनिहाय बसवण्यात आले आह़े त्या उपकरणामुळे हवामान बदलाची नेमकी स्थिती समजून विम्याचा लाभ शेतकऱयांना मिळत़ो त्यामुळे केवळ चारच मंडळातील उपकरणे कार्यान्वित होती का व अन्य 61 मंडळातील उपकरणे बंद होती का, असा सवाल उपस्थित होत आह़े रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाला आह़े आंबा, काजू आदी पीकांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जात़े मात्र गेल्या काही वर्षामधील बदलत्या हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला आह़े त्यामुळे शेतकऱयांचे उत्पन्न घटत आह़े शेतकऱयांचे नुकसान टाळण्यासाठी जिह्यात फळपीक विमा सुरु केली आह़े यावर्षी काजूवरील रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन घटल़े त्यातच कोरोनामुळे अपेक्षित दर मिळाला नसल्यामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले.
डिसेंबर 2019 ते मे 2020 या कालावधीत 2740 काजू उत्पादक शेतकऱयांनी 2260 हेक्टरचा विमा उतरवला. त्यातील 371 शेतकऱयांना 38 लाख 35 हजार 276 रुपये प्राप्त झाले आहेत़ उर्वरित 2369 शेतकऱयांना परतावा न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आह़े 61 मंडळातील हवामानाची नोंद करणारे उपकरण बंद असल्याचे सांगण्यात आले. परताव्यापासून वंचित शेतकऱयांना परतावा देण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले.









