मुंबई
हॉस्पिटल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया ओबेराय ग्रुपने दिर्घकाळासाठी मंडारीन ओरियंटल हॉटेल ग्रुपबरोबर धोरणात्मक भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे. वारसास्थळ संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये मंडारीन ग्रुपचा वाटा मोठा आहे. या भागीदारीतून ओबेराय ग्रुपला आपला व्यवसाय विस्तार अधिकाधिक करता येणार आहे. लक्झरी हॉटेल क्षेत्रामध्ये दोन्ही ग्रुपचे योगदान मोठे दिसून येते. या भागीदारीतून ओबेराय व मंडारीन यांना जागतिक स्तरावरही आपल्या व्यवसायाची कीर्ती पोहोचवता येणार आहे.









